गुरुवार, १५ जुलै, २०२१

कोविड -19 काळात मानसिक समुपदेशनासाठी टोल फ्री क्रमांक

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड -19 मुळे आपल्या प्रियजनांना गमविलेल्या अथवा अन्य कोणत्याही मानसिक ताण-तणावातून जात असलेल्या व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व मुंबई प्रोजेक्ट यांच्यामध्ये सामंजंस्य करार करण्यात आला आहे. मुंबई प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून 18001024040 हा टोल फ्री क्रमांक तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.डी. शिंदे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

          समुपदेशनाची गरज असलेल्या व्यक्तीस तज्ञ समुपदेशकांकडून ऑनलाईन सल्ला व मार्गदर्शन सुविधा दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत देण्यात येईल.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.