कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : नूतन
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे
यांच्याकडून आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
श्री. रेखावार यांनी ऑगस्ट
2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम
केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014 मध्ये सहायक
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली
होती. मार्च 2014 ते फेब्रुवारी 2015 या काळात नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी व
उपविभागीय अधिकारी तर फेब्रुवारी 2015 ते जुलै 2015 या काळात हिंगोली येथे मुख्य
कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.
जुलै 2015 ते एप्रिल 2018
मध्ये परभणी महापालिका आयुक्त, एप्रिल 2018 ते जुलै 2019 धुळे येथे जिल्हाधिकारी,
जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 महावितरण औरंगाबाद येथे सहायक संचालक, नंतर
फेब्रुवारी 2020 ते जानेवारी 2021 बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
गेल्या काही महिन्यांपासून ते अकोला येथे बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
म्हणून ते कार्यरत होते.
श्री. रेखावार हे करड्या शिस्तीचे
अधिकारी म्हणून प्रशासनात परिचित आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.