शुक्रवार, २३ जुलै, २०२१

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - पालकमंत्री सतेज पाटील

 


          कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हयात होत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सन २०१९ साली आलेल्या पुरापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराचे पाणी आपल्या घरापर्यंत येण्यापूर्वीच स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. जिल्ह्यातील जनतेने विशेषत: पूरग्रस्त भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

     पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, सन २०१९ साली राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ५५ फूट ६ इंच इतकी होती. शुक्रवारी सायंकाळी  ही पाणी पातळी जवळपास ५४ फूट इतकी झाली आहे. उद्याही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.  

          पुढचे ४८ तास कोल्हापुरसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क रहावे.  पूर पाहण्यासाठी शहरातील लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. आपत्तकालीन परिस्थितीत मानवतावाद जोपासावा त्याचबरोबर प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.