सोमवार, २६ जुलै, २०२१

जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांसाठी सानुग्रह अनुदान

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड-19 व अतिवृष्टी मुळे दिव्यांगाना उद्भवणाऱ्या अडचणी व समस्या कमी करण्याकरिता जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना प्रती दिव्यांग 500 रू. प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

अनुदान देण्यासाठी 1 कोटी 21 लाख 21 हजार 600 रू. इतके अनुदान पंचायत समितींना वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.