कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी
तसेच महामंडळाच्या योजनेसंदर्भात समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवार दि.
27 जुलै रोजी सकाळी 11 वा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन शिबीराचे आयोजन
करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त
संजय माळी यांनी दिली.
शिबीराचे थेट
प्रसारण महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
यांच्या फेसबुक पेजवरून होणार असून यावेळी महामंडळाचे जिल्हा समन्वयक, बँक अधिकारी
आणि उद्योग भवन अधिकारी संबंधित योजनांची माहिती देतील.
महामंडळाच्या
योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी जास्तीत-जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे
आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.