कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती
कार्यालय): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत सन 2021-22 या वर्षात
महाडिबीटी या संगणकीय प्रणालीव्दारे ड्रॅगन फ्रुट या फळपिकासाठी शेतकऱ्यांनी
महाडीबीटी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज
करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
ड्रॅगन
फ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व
पिक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. याकरिता रक्कम 4 लाख रू. प्रकल्पमुल्य ग्राह्य
धरून 40 टक्के प्रमाणे रक्कम रू. 1.60 अनुदान
तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी
90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.