मंगळवार, २० जुलै, २०२१

रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्वत:चे घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (महानगरपालिका क्षेत्र) अशी वैयक्तिक घरकुलाची योजना राबविण्यात येते. या योजनेकरिता कोल्हापूर शहरामधून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून या योजनेचा जास्तीत-जास्त गरजू अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेला जातीचा दाखला, महाराष्ट्र अधिवास दाखला, वार्षिक उत्पन्न 3 लाख पर्यंत मर्यादित असलेला दाखला, रेशनकार्ड, अर्जदार यांच्या नावे 30 चौ.मी. घरकुल बांधकामासाठी मोकळी जागा किंवा कच्चे घर असावे. तसेच महानगरपालिका यांनी दिलेला बांधकाम परवाना व शासन निर्णयाप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून विहीत नमुन्यातील अर्ज तत्काळ महानगरपालिकेकडे सादर करावेत.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यकारी अभियंता, महानगरपालिका किंवा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असेही  पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.