गुरुवार, १५ जुलै, २०२१

केंद्रीय सैनिक बोर्डाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिक, विधवा तसेच पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी सन 2021-22 मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखा घोषित झाल्या आहेत. दिलेल्या तारखेच्या आत www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि) कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.

          चरीतार्थ मदत-आर्थिक वर्ष 2021-22 माजी सैनिक, विधवा, वय दि. 1 एप्रिल 2020 रोजी 65 वर्षे पूर्ण, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022.

चरीतार्थ मदत नुतनीकरण- आर्थिक वर्ष 2021-22 ज्या माजी सैनिक, विधवांना या अगोदर चरीतार्थ मदत मंजूर झाली आहे. त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022.

विवाह मदत- विवाह दिनांक, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख विवाह दिनांकापासून 180 दिवसांपर्यंत.

 शालेय मदत- शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता 1 ली ते 9 वी व 11 वी साठी 30 सप्टेंबर 2021. इयत्ता 10 वी व 12 वी साठी 31 ऑक्टोबर 2021 व पदवीच्या आतील विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर 2021 अशी राहील.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.