कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जागतिक युवा
कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व
सिध्दम इनोवेशन व बिझनेस इन्क्युबेशन सेंटर,
कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कौशल्य विषयक मार्गदर्शन सत्र आयोजित
करण्यात आले.
मार्गदर्शन सत्रास महानगरपालिका आयुक्त
डॉ.कादंबरी बलकवडे तथा सह-अध्यक्ष कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समिती यांनी
युवक-युवतींना शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थिती नोंदविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले व उपस्थितांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या
शुभेच्छा दिल्या.
ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये महागांवच्या एस.जी.एम. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी उद्योग
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काळानुरुप बदल करावयाच्या बाबी व त्यांचे महत्त्व
याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सिबिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे
यांनी उद्योग हाच योग आणि नवीन उद्योग उभारणीसाठी असणा-या शासकीय व अशासकीय
योजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ओपेक्स ऍक्सलरेटर
प्रा.लि.चे
मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुंभोजे
यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कौशल्य शिफारशी विषयावर मार्गदर्शन केले.
इंडियन इंस्टिटयुट
ऑफ डिजीटल एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण शाह यांनी टॉप स्किल फॉर 2021 जॉब या विषयावर मार्गदर्शन
केले.
कौशल्य विकास कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 15
ते 20 जुलै अखेर पंडित दीनदयाळ उपाध्याय
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामध्ये 6 खाजगी उद्योजकांनी
सहभाग नोंदविला. यामध्ये 144 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली. या मेळाव्याचा
जास्तीत जास्त युवक युवतींना लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.