गुरुवार, १५ जुलै, २०२१

ऑनलाईन जॉबफेअरचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी  दिली.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, डिप्लोमा, टेक्निशियन डाटा प्रोसेसिंग असोशिएट,सॉफ्टवेयर डेव्हलर्पस,सपोर्ट एक्झिक्युटिव्ह,बिजिनेस डेव्हलपमेंट, हार्डवेअर नेटवर्कीग  अशी 10 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय, एमबीए, बीसीए, एमसीए या शैक्षणिक पात्रतेची जिल्हयातील नामांकित आस्थापनांनी 144 पेक्षा जास्त रिक्त पदांद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.

मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

          उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार 20 जुलै रोजी त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएमव्दारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल व शक्य असले तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलखतींचे आयोजन करण्यात येईल. इच्छुक युवक-युवतींनी 19 जुलैपर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.