सोमवार, १९ जुलै, २०२१

14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

 

 

          कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 124.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,  भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, कासारी नदीवरील-  यवलूज, कुंभी नदीवरील- कळे व शेणवडे, असे एकूण 14 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 55.42 दलघमी, वारणा 693.30 दलघमी, दूधगंगा 342.55 दलघमी, कासारी 51.15 दलघमी, कडवी 37.67 दलघमी, कुंभी 54.67 दलघमी, पाटगाव 69.87 दलघमी, चिकोत्रा 24.92 दलघमी, चित्री 36.27  दलघमी, जंगमहट्टी 16.03 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 18.63, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23 फूट, सुर्वे 22.3 फूट, रुई 52 फूट, इचलकरंजी 49 फूट, तेरवाड 45 फूट, शिरोळ 34 फूट, नृसिंहवाडी 30.6 फूट, राजापूर 20 फूट तर नजीकच्या सांगली 8.6 फूट व अंकली 9.10  फूट अशी आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.