रविवार, २५ जुलै, २०२१

सकारात्मक वृत्त एक पाऊल माणुसकीचे...

 


 

     कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : सध्या महापूराने सामान्य जनतेसह बळीराजाही त्रस्त झाला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी या पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्या नादुरूस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        ज्या मोटारी पाण्याखाली बुडाल्या आहेत त्यांना रिवायडींगची आवश्यकता नसते. परंतु ओव्हनमध्ये व्यवस्थित वाळविणे आवश्यक असते. नेमकी हिच बाब ओळखून शिरोली एमआयडीसीतील मेसर्स असोसिएटेड इंडस्ट्रीने 1000 एचपी पर्यंतच्या विद्युत मोटारींचे काम नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मोटारीमधील बिअरींग जर नादुरूस्त असल्याच तेवढाच खर्च संबंधितांकडून घेण्यात येईल. हे सर्व काम मानवतेच्या भावनेतून करण्यात येत आहे.

        जिल्ह्यातील विद्युत मोटारबाधित शेतकऱ्यांनी मेसर्स असोसिएटेड इंडस्ट्री, प्लॉट नं. डब्ल्यू-59, एमआयडीसी, शिरोली (कोल्हापूर), 9921067400 तसेच 9371100906 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.