बुधवार, १७ जून, २०२०

सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी उद्योगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन पाससाठी ई-मेलद्वारेच अर्ज करावेत प्राप्त अर्जांना 48 तासात मंजुरी -महाव्यवस्थापक सतीश शेळके



कोल्हापूर,दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय)-जिल्ह्यात राहणारे व जिल्ह्याच्या स्थलसीमालगत असणाऱ्या सातारा, सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खासगी आस्थापनामध्ये असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी दैनंदिन पाससाठी didickolhapur@gmail.com वर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी केले.
     ई-मेलद्वारे प्राप्त अर्जांचा निपटारा 48 तासात करण्यात येणार आहे. अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. 
 उद्योग घटकांने त्यांच्या लेटरहेडवर केलेला विनंती अर्ज.
व्यक्ती काम करत असलेल्या आस्थापनांचे प्रमाणपत्र.
व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत आधार कार्ड किंवा इतर रहिवास पुरावा.
व्यक्तीचे ओळखपत्र (कंपनीचे आय कार्ड/ वाहन परवाना/ पॅन कार्ड/ पासपोर्ट / बँक पासबुक/ केंद्र तसेच राज्य शासनाने निर्गत केलेले ओळखपत्र)
औद्योगिक आस्थापनांचे उद्योग आधार नोंदणी / कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/ जीएसटी प्रमाणपत्र/ शॉप अॅक्ट नोंदणी/ केंद्र, राज्य शासनाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
या कागदपत्रासह सोबतची माहिती एम एस एक्सेलमध्ये इंग्रजीत भरुन didickolhapur@gmail.com वर पाठवावी. सर्व पत्रव्यवहार ई-मेलद्वारेच होईल याची नोंद घ्यावी
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.