कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यातील
ग्रामीण भागासाठी खरेदी केलेल्या वॉटर एटीएम, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा मशीन
खरेदी व वित्त आयोगाच्या निधी आराखड्याबाहेर खरेदी इ. संदर्भात मुख्य कार्यकारी
अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने चौकशी कामकाजामध्ये ज्या व्यक्ती/ संस्था/
लोकप्रतिनिधी इ. यांना तक्रारी, निवेदने, पुराव्याचे कागदपत्र सादर करावयाचे
असल्यास उदय जाधव, उप सचिव, ग्राम विकास विभाग तथा चौकशी अधिकारी यांच्याकडे
गुरूवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत समिती सभागृह, तिसरा मजला,
जिल्हा परिषद येथे स्वीकारण्यात येणार आहे.
यावेळी कोविड-19
साथरोगासंदर्भातील निर्देशांचेही पालन करावे. तक्रारी/ निवेदने/ पुरावे इ. नमूद
केलेल्या वेळेत द्यावेत अथवा dattaram.mandavkar@nic.in
या ई-मेल द्वारे गुरूवार, 25 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. असे
कोल्हापूर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत
आडसूळ यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.