मंगळवार, १६ जून, २०२०

सैनिकी वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती



कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): सैनिकी मुलांच्या वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणाऱ्या पदासाठी इच्छुकांनी 25 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतीगृह व पन्हाळा तसेच सैनिकी मुलींच्या वसतीगृहाकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने सहाय्यक वसतीगृह अधीक्षक, अधीक्षीका, स्वयंपाकी बाई, सफाई कर्मचारी व पहारेकरी यांची पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. नियुक्तीमध्ये माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना प्राधान्य दिले जाईल. अर्जाच्या छाननीनंतर मुलाखतीसाठी हजर राहण्याबाबत कळविले जाईल.
इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय 0231-2665812 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.