कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व
घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत विवाह करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिले आहेत.
दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू
(कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा,
1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात
कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय
योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात
आलेले आहेत.
जिल्ह्यात
लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली
आहे. मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय,
मुंबई यांच्या दिनांक 31 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार विवाह कार्यक्रमासाठी
जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर
राहण्यास परवानगी देण्यात आलेली होती.
सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या
दिनांक 22 जून 2020 पत्रामध्ये खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल /
सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच
कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर
लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात
यावी, असे सूचित केलेले आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय
/ हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत खाली अटी व शर्तींना
अधिन राहून परवानगी देण्या करिता खाली नमुद अधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून
प्राधिकृत केले आहे.
1) लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांचे अनिवार्यतेने थर्मल स्कँनिग करण्यात
यावे.
2) लग्नाचे ठिकाणी प्रत्येक व्यक्तींने तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी
मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने
नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक आहे.
3) वर नमुद ठिकाणाच्या प्रवेशद्वार, बैठक कक्ष, भोजन कक्ष, बाथरुम,
प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिताची साधने
व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत.
4) भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या
मार्गदर्शक सूचनांनुसार लग्नाचे
ठिकाणी सामाजिक अंतराचा (Social Distancing) नियम
काटेकोरपणे पाळण्यात यावा.
5) 1% सोडीयम हायपोक्लोराईड वापरुन सदरचे ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात
यावे.
6) वरच्या मजल्यावर जाण्या येण्यासाठी जिन्याचा वापर करावा.
7) लग्न कार्यास उपस्थित राहणाऱ्या पन्नास (50) व्यक्तींनी त्यांचे
मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड
करणे बंधनकारक आहे.
अ.
क्र
|
प्राधिकृत अधिकारी
|
क्षेत्र
|
1 1
|
आयुक्त,
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
|
कोल्हापूर
महानगरपालिका क्षेत्र
|
2
|
तहसिलदार
तथा कार्यकारी दंडाधिकारी
(Incident
Commander)
|
महानगरपालिका
व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र
|
3
|
मुख्याधिकारी,
नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत
|
संबंधीत
नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र
|
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड
संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग
नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद
घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.