कोल्हापूर, दि. 25
(जिल्हा माहिती कार्यालय): 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य
साधून मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कसबा बावडा
येथील सेवा रूग्णालय येथे उद्या सकाळी 10.30 वाजता आयोजित केले आहे.
मादक
पदार्थांच्या तस्करी, व्यापार, तसेच सेवनामुळे आजची तरूण पिढी तसेच महाविद्यालयीन मुले
केवळ जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखून शेवटी व्यसनाच्या गर्तेत सापडत आहेत.
याचे गांर्भीर्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही लक्षात घ्यायला हवे. या कार्यक्रमास नागरिकांनी
उपस्थित रहावे असे आवाहन सेवा रूग्णालय कोल्हापूर येथील मानसोपचार तज्ञ डॉ. अपर्णा
कुलकर्णी यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.