कोल्हापूर, दि. २४ (जिल्हा माहिती अधिकारी)-
२५ मे पासून आजअखेर १६४ फ्लाईटसमधून ३ हजार ४२९ जणांनी प्रवास केला. कोरोनाच्या
आपत्तीजनक परिस्थितीत विमानतळ प्राधिकरणास सहकार्य केल्याबद्दल प्राधिकरणाचे
संचालक कमल कटारिया यांनी प्रवाशांचे आभार व्यक्त केले आहेत.
कोरोनासारख्या आपत्तीमध्ये कोल्हापूरमधून हैद्राबाद, बेंगलुरु आणि
तिरुपतीकडे जाणाऱ्या विमानसेवेचा लाभ प्रवाशांनी घेतला आहे. यासाठी कमीत-कमी
कर्मचारी आतून आणि बाहेरील परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपली सेवा बजावत आहेत.
प्रवाशांची सुरक्षिततेला प्राधान्य देत या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.