कोल्हापूर,
दि. १६ (जिल्हा माहिती कार्यालय)- लाच मागणाऱ्या भ्रष्ट
लोकसेवका विरुद्ध
नागरिकांनी १०६४ तसेच ७०८३६६८३३३ वर निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज केले.
सर्व
नागरिकांनी तक्रार देण्यापूर्वी त्यांच्या तक्रारीची सार्वजनिक ठिकाणी चर्चा न
करता, गोपनीयता ठेवावी. त्यामुळे भ्रष्ट लोकसेवकाविरुद्ध यशस्वी कारवाई होण्यास
मदत होते, असे सांगून पोलीस उप अधीक्षक श्री बुधवंत म्हणाले, सापळा कारवाई
झाल्यानंतर तक्रारदाराचे प्रलंबित शासकीय काम प्राधान्यांने पूर्ण करुन दिले जाईल.
तसेच आरोपीकडून तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेवू. लाच
मागणाऱ्या भ्रष्ट लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे तक्रार दाखल करावी.
त्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ७०८३६६८३३३ वर संपर्क करावा.
0 0 0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.