शुक्रवार, १९ जून, २०२०

लॉकडाऊन कालावधीतील फक्त प्रलंबित कच्ची व पक्की अनुज्ञप्ती कामकाज सोमवार पासून - प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस




कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय)- 19 मार्च ते 18 जून या लॉकडाऊन दरम्यान उमेदवारांनी सार्थी-04 या संगणकीय प्रणालीवरुन कच्चा व पक्या अनुज्ञप्ती करिता अपॉईमेंट घेतली आहे. त्या उमदेवरांच्या अपॉईमेंट 22 जून ते 3 ऑगस्ट या दरम्यान रिशेडयूल (Reshedule) करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी कळविले आहे.
       याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आलेली आहे. अपॉईमेंट रिशेडयूलबाबतचे संगणकीय प्रणालीद्वारे मॅसेज उमेदवाराने अर्जामध्ये नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर https://sarathi.parivahan.gov.in  या संकेतस्थळावर Apply Online मधील Application Status मध्ये उमदेवारांच्या आपल्या Application चे Status पाहता येतील. उमेदवारांनी नमुद तारखेस प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कागदपत्रासह सकाळी 7.30 ते 9 या कालावधीतच उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. अल्वारिस यांनी केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.