कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): मोटर वाहन
निरीक्षक तथा केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांच्या स्मरणार्थ
आज मोरेवाडी टेस्ट ट्रॅक येथे वृक्षारोपण करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी
डॉ. स्टीव्हन अल्वारिस व शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रकाश गायकवाड
यांच्या हस्ते वड, पिंपळ अशा 3 ते 4 वर्षे वाढलेल्या रोपांचे रोपण करण्यात आले.
केएमटीचे
अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक देसाई यांचे दिनांक 13 जून रोजी निधन झाले. त्यांचे कार्य
आणि लोकसेवेची आठवण राहण्यासाठी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष
ट्रॅकवर येणा-या जनतेला वर्षानुवर्षे सावली देवून दिवंगत देसाई यांच्या लोकसेवेची
आठवण देतील, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश गायकवाड यांनी केले. तसेच दिवंगत देसाई
यांच्या कर्तव्यदक्षतेच्या गुणांचे आचरण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे
प्रतिपादन या प्रसंगी डॉ. अल्वारिस यांनी केले.
यावेळी कृषी संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी
मयुर सुतार व हवामान निरीक्षक विशाल पोवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद
गाजरे, मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, रमेश सातपुते, प्रशांत इंगवले, सहायक
मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव, श्रीमती सुप्रिया गावडे तथा वाहन मालक, चालक
उपस्थित होते.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.