ल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक
कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) मार्फत बांबू लागवडीचे महत्व व
व्यावसायिक संधी या विषयावर दि. 27 ते 29
एप्रिल 2021 असे 3 दिवसांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापनाचे प्राचार्य उमेश पाटील यांनी दिली.
या प्रशिक्षणामध्ये मंगळवार दि. 27 एप्रिल रोजी
सकाळी 11 ते 12.30 वा. बांबू लागवडीसाठी
व्यावसायिक संधी व आव्हाने या विषयावर अरूण वांद्रे यांचे तर दुपारी 2 ते ते 3.30
वा. बांबू लगावडीसाठी राष्ट्रीय बांबू अभियान या विषयावर संदीप थेंग यांचे व्याख्यान
होणार आहे.
बुधवार दि. 28 एप्रिल रोजी
सकाळी 11 ते 12.30 वा. बांबू पिकाचे विविध वाण व व्यावसायिक लागवड तंत्रज्ञान या विषायावर
अरूण वांद्रे तर दुपारी 2 ते 3.30 वा. महाराष्ट्रासाठी बांबू लागवड प्रोत्साहनपर योजना
या विषयावर अजित भोसले यांचे व्याख्यान होणार आहे.
गुरूवार दि. 29 एप्रिल रोजी
सकाळी 11 ते 12.30 या वेळेत बांबू प्रक्रिया
आणि उत्पादने या विषयावर नविनकुमार माळी यांचे, दुपारी 2 ते 3.30 या वेळेत बांबू
उत्पादक-यशोगाथा या विषयावर डॉ. संदिप चोपडे यांचे तर दुपारी 4 ते 5.30 वा. बांबू
उत्पादक –यशोगाथा या विषयावर प्रसाद रोटे यांचे व्याख्यान होणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.