कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रेल्वेने
प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रमाणित
कार्यपध्दतीचा अवलंब करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
A) रेल्वेमार्गे
महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना याप्रमाणे
राज्याअंतर्गत
(स्थानिक लोकल ट्रेन वगळता) प्रवास करणाऱ्या रेल्वेसाठी कोव्हीड Appropriate वर्तवणूक ही अत्यावश्यक बाब असेल. कोव्हीड
Appropriate वर्तवणुकीचे / मार्गदर्शक
सूचनांचे योग्य रित्या पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याची रेल्वे प्राधिकरण
आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची जबाबदारी असेल. या मार्गदर्शक
सूचनांमध्ये खालील सूचनांचा समावेश असेल.
सर्व
प्रवाशांनी रेल्वेमधील प्रवासादरम्यान आणि संबंधित रेल्वेस्थानकावर योग्य रित्या
मास्क वापरणे बंधनकारक असेल. सर्व प्रवाशांनी रेल्वेद्वारे प्रवास करताना /
रेल्वेमधून स्टेशनवर उतरताना किंवा आवश्यकता असल्यास तपासणी केली जात असताना योग्य
सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असेल. सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर
जाण्याच्या ठिकाणी ( Entry and Exit Point) शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल
स्कॅनर उपलब्ध ठेवणे बंधनकारक असेल. सर्व प्रवाशांनी रेल्वे सुटण्याच्या वेळे अगोदर
रेल्वे स्थानकावर यावे, जेणेकरून प्रवेशव्दारावर सर्व प्रवाशांचे थर्मल स्कॅनिग
करणे सोयीचे होईल. ई तिकिट / मोबाईल तिकिट बुकींग करण्याबाबत सर्व प्रवाशांना
प्रोत्साहित करावे, जेणेकरून मोबाईल नंबर व्दारे संबंधित प्रवाशाच्या संपर्कातील
सर्व व्यक्तींचा शोध घेणे सोयीचे होईल. दंड आकारणी ही देखील मोबाईल आधारीत किंवा ई
कलेक्शनव्दारे केली जाईल.
B)
संवेदनशिल घोषित केलेली राज्ये / भाग –
राज्यातील
कोव्हीड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या
ठिकाणाहून प्रवास करून येणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी खालील राज्ये ही संवेदनशील मुळ असलेली राज्य किंवा भाग
म्हणून या आदेशाच्या दिनांकापासून कोव्हीड -19 आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यत
घोषित केलेली आहेत ती याप्रमाणे केरळ,
गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र व
उत्तराखंड
महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हीड -19 संसर्ग मोठया प्रमाणात
होत असल्यामुळे वरील राज्ये ही संवेदनशिल मुळ असलेली राज्ये म्हणून घोषित करण्यात आहेत.
या ठिकाणाहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी वरील मुद्या क्रं. A) मध्ये नमूद
मार्गदर्शक सूचनांच्या बरोबर खालील सूचनांचाही समावेश करण्यात येत आहे.
रेल्वेप्रशासनाने
वर नमूद राज्यामधून तसेच महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवरून रेल्वेव्दारे प्रवास
करणाऱ्या प्रवाशांची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांस कळविण्यात
यावे. संबंधित संवेदनशिल मुळ असलेल्या राज्यामधून महाराष्ट्रासाठी प्रवास करणाऱ्या
प्रवाशांसाठी कोणतेही अनारक्षित तिकीट मंजूर करण्यात येऊ नये. तसेच प्रवाशांसाठी
आरक्षित तिकिट असल्या शिवाय महाराष्ट्रात प्रवासासाठी परवानगी देण्यात येऊ नये. महाराष्ट्रासाठी
प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांकडे 48 तासासाठी वैध असलेले RTPCR -Ve
प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. महाराष्ट्रासाठी प्रवास करणाऱ्या सर्व
प्रवाशांची तपासणी करण्यात यावी. आणि फक्त लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना परवानगी देण्यात
यावी. रेल्वेमध्ये चढताना, उतरताना आणि प्रवासादरम्यान, योग्य सामाजिक अंतर राखले
जाईल याची खात्री करावी. रेल्वेप्रशासनाने महाराष्ट्रासाठी प्रवास करणाऱ्या सर्व
प्रवाशांची माहिती सदर प्रवासी महाराष्ट्रातील विविध स्थानकांवर उतरण्यासाठी निश्चित
असलेल्या वेळी, दरदिवशी रेल्वे संबंधित संवेदनशिल मुळ असलेल्या राज्यांच्या
रेल्वेस्थानकांमधून रेल्वे सुटणेच्या 4 तास अगोदर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणास कळविण्यात यावे. या माहितीमध्ये महाराष्ट्रातील स्थानकांवर उतरणाऱ्या
सर्व प्रवाशांची माहिती समाविष्ठ करावी. तसेच काही वेळी संपूर्ण माहिती उपलब्ध
नसल्यास, स्थानिक आपत्ती प्राधिकरणास 10 % जादा प्रवाशी उतरतील याअनुषंगाने नियोजन
करणे सोयीचे होईल. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक जिल्हा आपत्ती प्राधिकरण यांनी वेळोवेळी
संपर्कात राहून रेल्वे सुटण्याच्या वेळामध्ये बदल झाल्यास किंवा उशीर झाल्यास
त्यासंबंधीची माहिती आणि उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या या माहितीचे अदान प्रदान
करावे. रेल्वेप्रशासनाने सर्व रेल्वेस्थानकांवर तसेच रेल्वेमार्गावर
प्रवाशांव्दारे पाळावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे घोषणा करण्याची पध्दत अवलंबावी,
जेणेकरून सर्व प्रवाशांना या सूचनांचे पालन करता येईल. रेल्वेप्रशासनाने सर्व
प्रवाशांच्या माहितीसाठी मराठी आणि हिंदीमध्ये
कोव्हीड Appropriate वर्तवणूकीची
पत्रके छपाई करावीत ज्याव्दारे संबंधित प्रवाशांना त्यांना आणि त्यांच्या
कुटुंबाला असलेला कोव्हीड -19 संसर्गाचा धोक्याची जाणीव होईल. तसेच यामध्ये
सूचनांचा भंग केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या माहितीचाही समावेश करावा. रेल्वेप्रशासनाने
शक्य असल्यास वरील संवेदनशिल असलेल्या राज्यामधून महाराष्ट्र राज्यातील रेल्वेस्थानकावर
प्रवासी उतरण्यासाठी आल्यास संबंधित स्थानकावरील
स्वंतत्र प्लटर्फामवर सोय करावी. जेणेकरून सदर प्रवाशांची तपासणी करणे
सोयीचे होईल. तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांमध्ये मिसळून त्यांना संसर्ग होणार नाही. शक्य असल्यास सर्व
प्रवाशांना स्थानकावर उतरताना एकाच
प्रवेशव्दारामधून जाण्यासाठी सोय करावी.
रेल्वेमधून प्रवासी उतरल्यानंतर खालील गोष्टीचे
पालन करावे.
सर्व
प्रवाशांच्या योग्य सामाजिक अंतर राखून तपासणीसाठी रांगा कराव्यात, जेणेकरून
रेल्वेप्रशासनाच्या मदतीने स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण / आरोग्य विभागामार्फत
तपासणी करणे सोयीचे होईल. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित ठिकाणी
शक्य असल्यास स्वंतत्र कक्ष तयार करावा. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात यावी.
ज्याप्रवाशांकडे RTPCR -Ve प्रमाणपत्र असेल त्या प्रवाशांची किमान शरीराचे
तापमान आणि शरीराची लक्षणे तपासावित. वरील सर्व सोयी नियम करून देखील काही
प्रवाशांनी -Ve RTPCR प्रमाणपत्र जवळ
बाळगले नसल्यास त्या ठिकाणी शक्य असल्यास रेल्वे / राज्य सरकार किंवा खाजगी
प्रयोगशाळा यांचेमार्फत Rapid Antigen Test
सुविधा उपलब्ध ठेवावी. सदर सुविधा ठेवणे शक्य नसल्यास किंवा सुरवात झाली
नसल्यास संबंधित स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांनी संबंधित प्रवाशांची
संपूर्ण तपासणी करावी. आणि सदर प्रवाशी बाधित नसल्याची खात्री झालेनंतर जाण्यास
परवानगी द्यावी. प्रत्येक कोव्हीड -19 + Ve असलेला किंवा लक्षणे असलेला किंवा
तपासणीस नकार देणाऱ्या प्रवाशांना स्थानिक जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत अलगीकरण
कक्षात ठेवण्यात यावे. संबंधित प्रवाशी जर स्वत: चे इच्छेने रुग्णालयात दाखल
होण्यास तयार असल्यास तशी परवानगी स्थानिक जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत देण्यात
यावी. सर्व लक्षणे नसलेले किंवा विलगीकरण करणे आवश्यक नसलेले प्रवाशी यांना
त्यांच्या हातावर 15 दिवस गृह अलगीकरण असा शिक्का मारण्यात यावा. त्याचबरोबर ज्या
प्रवाशांकडे -Ve RTPCR प्रमाणपत्र तसेच
रेल्वे स्थानकावर RAT तपासणी दरम्यान – Ve
चाचणी असल्यास यांना देखील 15 दिवस गृह अलगीकरण असा शिक्का मारण्यात यावा. गृह
अलगीकरण शिक्का असलेला कोणताही व्यक्ती वैद्यकीय कारणाशिवाय या 15 दिवसाच्या
अलगीकरण कालावधीमध्ये बाहेर फिरत असल्याचे निर्दशनास आल्यास त्यास रक्कम रुपये
1000/- दंड व संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे. स्थानिक जिल्हा आपत्ती प्राधिकरण
यांनी स्थानिक MSRTC / स्थानिक सार्वजनिक बससेवा अधिकाऱ्यांशी समन्वयाने
प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसेसचे नियोजन करावे. जेणेकरून जास्तीत
जास्त रेल्वेप्रवाशी रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यानंतर नेमून दिलेल्या MSRTC /
स्थानिक सार्वजनिक बससेवेचा वापर करून कमीत कमी लोकांच्या संपर्कात येऊन प्रवास
करील याबाबत नियोजन करणे. MSRTC / स्थानिक सार्वजनिक बससेवा अधिकारी यांनी जास्तीत
जास्त प्रवासी मार्ग कव्हर होतील किंवा शक्य असल्यास सोयीनूसार मार्ग निश्चित
करावे. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत संबंधित
संवेदनशिल मुळ असलेल्या राज्यामधून येणाऱ्या रेल्वेबाबत अतिरिक्त खबरदारी घ्यावी. कोव्हीड
Appropriate वर्तवणूकीचे रेल्वे आणि
रेल्वेस्थानकावर काटेकोरपणे पालन केले जाईल. सर्व Entry व
Exit व्दाराजवळ थर्मल स्कॅनर
नसलेचे दिसून येते. तरी रेल्वेप्रशासनाने तात्काळ सर्व ठिकाणी व्यवस्था करावी. संबंधित
संवेदनशिल राज्याच्या माहिती व जनसंपर्क
विभागाने सदर निर्णय सर्व राज्यामध्ये तसेच प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशी यांच्या
प्रवासास सुरू होणेअगोदर निर्दशनास आणुन द्यावे. संबंधित विभागाने महाराष्ट्रासाठी
प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासांसाठी 48 तास मुदतीतील RTPCR
-Ve प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक
असेल. याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात. ज्यावेळी रेल्वेस प्रवाशांच्या उतरण्याच्या
ठिकाणपर्यत पोहचणेसाठी खूप वेळ असेल तसेच सर्व प्रवासी बसलेले असतील त्यावेळी
रेल्वे प्रशासन या प्रवाशाच्या वेळेपर्यत काही चाचण्या किंवा कार्यवाही करून
शकतील. जेणेकरून प्रवाशी रेल्वेस्थानकांवर उतरल्यानंतर तपासणीचा कालावधी कमी होईल.
रेल्वे प्रशासनाने स्थानिक जिल्हा पातळीवर जिल्हा आपत्ती प्राधिकरणाशी संपर्क
करण्याकरीता समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणेकरून मार्गदर्शक सूचनांचे
पालन करणे सोयीचे होईल.
आदेशाचा अंमल तात्काळ करावा. आदेशाचे पालन न करणाऱ्या
कोणतीही व्यक्ती अथवा
संस्थेवर भारतीय दंड
संहीता 1860 (45) याच्या कलम 188,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे
फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.