बुधवार, २८ एप्रिल, २०२१

रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी; फायर, इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडीटसाठी समिती गठीत -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड -19 च्या रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने राज्याबाहेरुनही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्रणाली कार्यन्वित असून ऑक्सिजन वायू नलिकांव्दारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. बाधित झालेल्या सर्व रुग्णांना त्वरीत वैद्यकीय उपचार देण्याकामी ऑक्सिजन पुरवठा हा रुग्णांच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा घटक असून त्याचा योग्य वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालींची तपासणी होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर संबंधित रुग्णालयांचे Fire Audit करणे याअनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांची समिती गठीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

           ऑक्सिजन वाया जाऊ न देता त्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी करणे,Fire Audit , Electrical Audit , Structural Audit पूर्ण करणे व  त्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

 

अ.क्र.

समितीतील अधिकारी यांचे नांव व पदनाम

समितीतील पदनाम

1

श्री.दौलत देसाई, जिल्हाधिकारी,कोल्हापूर

अध्यक्ष

2

डॉ कांदबरी बलकवडे, आयुक्त, कोल्हापूर महानरगपालिका

सदस्य

3

श्री शैलेश बलकवडे, पोलीस अधिक्षक, कोल्हापूर 

सदस्य

4

श्री. प्रशांत आर पटलवार, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर

सदस्य-सचिव

5

श्री. रविंद्र मुंडासे, प्राचार्य, औदयोगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

सदस्य

6

श्री. संभाजी माने, अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर

सदस्य

7

श्री अंकुर कावळे, अधिक्षक अभियंता, म.रा.वि.म.कं.कोल्हापूर

सदस्य

8

श्री. एम.आर.शिंदे,  कार्यकारी अभियंता,विद्युत,सा.बा.विभाग,कोल्हापूर

सदस्य

9

श्री.ए.बी.खरटमल, उपसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य,कोल्हापूर

सदस्य

10

डॉ. एस.एस.मोरे, अधिष्ठाता राजर्षी शाहू वैदयकीय महाविदयालय, कोल्हापूर

सदस्य

11

डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

सदस्य

12

डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर

सदस्य

13

डॉ. अशोक पोळ, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कोल्हापूर

सदस्य

14

श्री विलास सोनवणे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी, कोल्हापूर

सदस्य

15

श्री. जयंत घेवडे, प्राचार्य, ग्रामीण तंत्रनिकेतन, गारगोटी

सदस्य

16

श्री.रणजीत चिले, अग्नीशमन अधिकारी,मनपा,कोल्हापूर

सदस्य

17

डॉ. जयदिप बागी, संचालक, तंत्रशास्त्र अधिविभाग,शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर

सदस्य

 

 

सदर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी सोबत जोडले परिशिष्टामध्ये विषयनिहाय नमूद केलेले कामकाज पार पाडावयाचे आहे.

सदर आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेणेत यावी. 

 

अ)   ऑक्सिजन ऑडीट विषयक करावयाचे कामकाज

 

1.      कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणाली व वायूनलिकां याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणेकडून यादी प्राप्त करुन घ्यावी.

2.      तांत्रिक मनुष्यबळाव्दारे जिल्हयातील शासकीय तसेच खाजगी रुण्ग्णालयातील ऑक्सिजन वायूनलिकांची तसेच संपूर्ण ऑक्सिजन प्रणालीची कालबध्द कार्यक्रम आखून तपासणी करुन घ्यावी.

3.      कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन वापरावा लागणारे पेंशट ( By Cylinder and By Piped Beds)  याची माहिती घेणे.

4.      कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील Oxygen cryogenic tank आस्थापित केला आहे अगर कसे? असल्यास क्षमता (in KL), LMO Supplier चे नांव, व पुरवठा विषयक माहिती घेणे.

5.      Oxygen generation plant आस्थापित केला आहे अगर कसे? असल्यास क्षमता (in KL) याची माहिती घेणे.

6.      ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्याचे ठिकाणी केलेले इलेक्टिकल वायरिंग, खोलीतील तापमान, स्वच्छता, तसेच सदर खोलीमध्ये फक्त ऑक्सिजन सिलेंडर ठेवणेत आले आहे अगर कसे? याची तपासणी करणे.

7.      ऑक्सिजन सिलेंडरचे लेबलिंग , भरलेली सिलेंडर व रिकामे सिलेंडर यांची स्वंतत्र  व्यवस्था , भरलेल्या सिलेंडरच व्हॉल्व्ह बंद असणे, गॅस सिलेंडरचे वारंवार Hydrostatic Testing , गॅस सिलेंडरची तपासणी, गॅस सिलेंडरच्या ने आण करणेसाठी असलेली व्यवस्था , Pressure Valve, Regulator, Manifolds, Hoses, Gauges आणि  Relif Valve तसेच Leakage बाबत Leak Detecting Liquid वापरून तपासणी करणे.

8.      सदर गॅस सिलेंडर, त्याचा वापर, हाताळणी तपासणी करणेसाठी प्रशिक्षित मुनष्यबळ नियुक्त केलेबाबतची माहिती.

9.      Oxygen cryogenic tank चे  PESO  Certificate, Certificate for Relif Valve, Internal Valve, Excess flow, Valve, Hydrostatic Test on Compressed gas above grand static & Mobile Cylindrical Vessels यांचे प्रमाणपत्र तपासणे.

10.   Oxygen cryogenic tank चे ठिकाणी CC TV, Ventilation तसेच अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजना , Safty of Relif Valves याची तपासणी करणे.

11.  LMO Supply बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था तपासणे .

12.  Oxygen cryogenic tank चे वापर, हाताळणी तपासणी करणेसाठी प्रशिक्षित मुनष्यबळ नियुक्त केलेबाबतची माहिती.

13.  Oxygen pipeline, Valve, Joints मधील Leakage बाबत Leak Detecting Liquid वापरून तपासणी करणे. अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजना याची तपासणी करणे. तसेच सदरकामी प्रशिक्षित मुनष्यबळ नियुक्त केलेबाबतची माहिती घेणे.

14.  Oxygen pipeline, Cylinder and Tank चे ठिकाणी दुरूस्ती विषयक सर्व प्रकारचे उपकरणे / साहित्य उपलब्ध आहे अगर कसे ? तसेच सदरकामी प्रशिक्षित मुनष्यबळ नियुक्त केलेबाबतची माहिती घेणे.

15.  सदर तपासणीच्या वेळी वायूनलिकांमध्ये गळती असल्यास अथवा पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्यास याबाबतचा अहवाल  समितीकडे सादर करावा. जेणेकरुन सदर अहवाल विचारात घेऊन शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायूनलिका बाबत आवश्यक त्या दुरुस्त्या तात्काळ करणे सुलभ होईल.

16.  ऑक्सिजन प्रणाली व वायू नलिका बाबत संबंधित खाजगी रुग्णालयास संबंधित खाजगी रुग्णलयातील तपासणी अंती दुरुस्ती व तातडीची खबरदारीचे उपाय करणेबाबत सूचना देऊन उचित कार्यवाही होईल, याची दक्षता घ्यावी.

17.  ऑक्सिजन प्रणाली व वायूनलिका तपासणी करुन ऑक्सिजन वाया जाऊ नये तसेच कोणत्याही प्रकारची अघटित दुर्घटना होऊ नये, याबाबत सुचविलेले उपाय संबंधित रुग्णलयांकडून पूर्ण केलेले आहेत याबाबत फेरतपासणी (re-audit)करुन अहवाल सादर करणे.

 

ब) Fire and Electrical ऑडीट विषयक करावयाचे कामकाज -

1.      कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाची इमारत, समाविष्ठ खोल्या, जिना, बाहेर पडण्याचा मार्ग, बेसमेंट, इत्यादी तसेच इमारतीच्या अंतर्गत लिफट , interior design आणि त्याची सद्यस्थिती याची माहिती घेणे.

2.      इमारतीतील सर्व इलेक्ट्रिक वायरिंग, स्विच, स्विचबोर्ड इत्यादी सर्व आस्थापित केलेल्या सर्व बाबीची तपासणी करणे.

3.      इमारतीतील सर्व इलेक्ट्रिक फिटींगचे इलेक्ट्रिकल निरिक्षकामार्फत तपासणी झालेची माहिती व अहवाल घेणे.

4.      इमारतीमध्ये स्टोअर रुम, इलेक्ट्रिक केबीन, ट्रान्सफॉमर ठिकाण, एसीची तपासणी इत्यादीबाबीची तपासणी करणे.

5.      रुग्णालयातील बेडची संख्या, तसेच रुग्णालयात भेट देणाऱ्या अभ्यागतांची संख्या याची माहिती घेणे.

6.      सदर रुग्णालयाच्या ठिकाणी वापरणेत येणारे गॅस, गॅस साठवयाचे स्टोरेज माहिती, सिलेंडर संख्या, स्टोअर रुम मध्ये असलेले ॲसिड व इतर घटक याची माहिती घेणे. व ते सुस्थितीत असलेची माहिती घेणे.

7.      रुग्णालयाच्या इमारतीचा प्लॉन सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता असलेबाबत, सर्व NOC, Completion Certificate, fire fighting installation  इत्यादीची तपासणी         

8.       रुग्णालयामध्ये करणेत आलेल्या आग प्रतिबंधात्मक उपाययोजना जसेकी, Fire Instiguisher, Fire Smoke Detectors, Sprinklers, Mannuallied Call Points / Public Address System, Fire Fighting Pump, Water Tank इत्यादीची तपासणी व सुस्थितीत असलेची माहिती घेणे.

9.       रुग्णालयामार्फत करणेत आलेले आगप्रतिबंधात्मक उपाययोजना व जागृती कार्यक्रम जसे की मॉक ड्रील, फायर सेफटी ऑफीसर व प्रशिक्षित मन्युषबळाची नेमणूक , ॲम्बुलन्स उपलब्धतता, आगीपासून सुरक्षा देणाऱ्या साधनांची उपलब्धतता इत्यादीची माहिती घेणे.

10.  Fire and Electrical Audit  बाबत संबंधित खाजगी रुग्णालयास संबंधित खाजगी रुग्णलयातील तपासणी अंती दुरुस्ती व तातडीची खबरदारीचे उपाय करणेबाबत सूचना देऊन उचित कार्यवाही होईल, याची दक्षता घ्यावी.

11.  Fire and Electrical Audit  करुन कोणत्याही प्रकारची अघटित दुर्घटना होऊ नये, याबाबत सुचविलेले उपाय संबंधित रुग्णलयांकडून पूर्ण केलेले आहेत याबाबत फेरतपासणी (re-audit)करुन अहवाल सादर करणे.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       

क) Structural ऑडीट विषयक करावयाचे कामकाज -

1.      कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाची इमारत, समाविष्ठ खोल्या, जिना, बाहेर पडण्याचा मार्ग, बेसमेंट, इत्यादी तसेच इमारतीच्या अंतर्गत लिफट, interior design, छत आणि त्याची सद्यस्थिती याची माहिती घेणे.

2.      सर्व रुग्णालयाच्या इमारतीची यापूर्वी करणेत आलेली डागडुजी, दुरूस्ती यांची वर्षनिहाय माहिती घेणे. सदर दुरूस्तीअंती इमारतीच्या वेगवेगळया भागाबाबत जसेकी भिंती, छत इत्यादीबाबीबाबत निरिक्षणे घेणे.

3.      Structural Audit बाबत वेगवेगळया चाचण्या करून जसेकी Core Test, Chemical Analysis, Cement Aggregate Ratio इत्यादीबाबत निष्कर्ष व करावा लागणाऱ्या दुरूस्त्या याबाबत कार्यवाही करणेबाबत सूचना देणे.

4.      Structural Audit बाबत संबंधित खाजगी रुग्णालयास संबंधित खाजगी रुग्णलयातील तपासणी अंती दुरुस्ती व तातडीची खबरदारीचे उपाय करणेबाबत सूचना देऊन उचित कार्यवाही होईल, याची दक्षता घ्यावी.

5.      Structural Audit करुन कोणत्याही प्रकारची अघटित दुर्घटना होऊ नये, याबाबत सुचविलेले उपाय संबंधित रुग्णलयांकडून पूर्ण केलेले आहेत याबाबत फेरतपासणी (re-audit)करुन अहवाल सादर करणे.                      

000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.