कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती
कार्यालय): खाजगी तत्त्वावर
सुरू झालेले शिरोली अंकली महामार्गाचे काम या कामाचे ठेकेदार सरकार विरोधात लवादा
मध्ये गेल्यामुळे बंद पडले होते, शिरोली अंकली हा मार्ग राष्ट्रीय विकास
प्राधिकरणाडे वर्ग करावा यासाठी राज्याच्या वित्त विभागाने मान्यता द्यावी अशी
मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांच्याकडे केली
होती याचाच भाग म्हणून वित्त मंत्री अजित दादा पवार यांनी शिरोली अंकली मार्गासह
राज्यातील असे १३ मार्ग राष्ट्रीय विकास प्राधिकरणा कडे वर्ग करण्याबाबत सकारात्मक
भूमिका घेतली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र
पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे, बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर काही
वर्षांपूर्वी शिरोली अंकली मार्गाचे काम सुरू झाले होते परंतु ठेकेदार लवादामध्ये
गेल्यामुळे सदरचे काम बंद पडले होते या मार्गावर असणारी प्रचंड वाहतूक व
मार्गाच्या झालेल्या अपुऱ्या कामामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती
त्यामुळे अपुरे राहिलेले हे काम पूर्ण होण्यासाठी संबंधित मार्ग हा राष्ट्रीय
विकास प्राधिकरण भूपृष्ठ मंत्रालयाकडे वर्ग करण्यात यावा आणि त्यासाठी राज्य
शासनाच्या वित्त विभागाने मान्यता द्यावी अशी भूमिका आपण मुख्यमंत्री नामदार अजित
दादा पवार यांच्यासमोर मांडली होती, याच विषयावर महाराष्ट्र राज्याचे बांधकाम
मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे यापूर्वी बैठकीचे आयोजन करून राज्य शासनाच्या
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामी सकारात्मक चर्चा झाली होती, आणि बांधकाम
विभागाने शिरोली अंकली मार्गाचा विषय वित्त विभागाकडे पुढील निर्णयासाठी सादर केला
होता,याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज
शिरोली सांगली मार्गासह राज्यातील इतर १३ मार्गांबाबत चर्चा करून निर्णय
घेण्यासाठी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत शिरोली
अंकली मार्गसह इतर १३ मार्ग राष्ट्रीय विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, लवकरच मंत्रिमंडळाच्या
बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल असे सांगताना याबाबत तातडीने केंद्रीय रस्ते विकास
मंत्रालयाकडे या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी अशी मागणी करणार
असल्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.