मंगळवार, २० एप्रिल, २०२१

ब्रेक द चेन आदेशाचा भंग केल्याने प्रियदर्शनी पॉलीपॅक्स कंपनीवर दंडात्मक कारवाई

 


 




कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : ब्रेक द चेन आदेशाचा भंग केल्याने हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसीमधील प्रियदर्शनी पॉलीपॅक्स या कंपनीवर 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे हातकणंगलेचे तहसलिदार प्रदीप उबाळे यांनी कळविले आहे.

 ब्रेक द चेन आदेशाचा भंग व कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यामुळे मंडळ अधिकारी हेरले व तलाठी यांच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.