सोमवार, २६ एप्रिल, २०२१

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरूवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या कालावधीत 10 वी, 12 वी नंतर करिअरच्या संधी या विषयावर आशुतोष साळी, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, ठाणे यांचे ऑनलाईन समुपदेशन/मार्गदर्शन सत्र आयोजित केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली.

10 वी, 12 वी झालेल्या जास्तीत जास्त युवक युवतींनी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. या मार्गदर्शन सत्रासाठी जॉईन होण्यासाठी meet.google.com/zwo-ycqo-cbu ही लिंक देण्यात आली आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.