कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था व त्यांची
ATM मशीन सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. परंतु, सुरू
असलेल्या बँका/वित्तीय संस्था व त्यांची ATM मशीन असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात
गर्दी होत असल्याने कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे
कोव्हिड-19 चा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व बँकाना प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्याचे निर्देश दिले आहेत.
1)
बँकांनी
आपल्या कामकाजासाठी शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक कर्मचारी उपस्थित
ठेवून ग्राहकांना सेवा द्यावी जेणेकरून ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीत-कमी
वेळ व्यतीत करता यईल.
2)
बँकांनी/वित्तीय
संस्थांनी एका वेळेस कमीत कमी ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व
प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेत आतमध्ये
येण्यास परवानगी देऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत 1 मिटर इतके अंतर ठेवावे.
3)
सर्व
बँकानी / वित्तीय संस्थांनी आप-आपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच
इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इ. सुविधांचा
वापर करण्याबाबत जागृती / अवाहन करावे.
4)
बँकेत
ग्राहकांना काऊंटर पासून 1 मीटर अंतर ठेवणे बाबत सुचीत करावे.
5)
सर्व
बँकांनी / वित्तीय संस्थांनी आप आपल्या एटीएम, कॅश/चेक डिपॉझिट, पासबुक प्रिटींग ई
सेवा असणाऱ्या मशिनची वेळोवेळी स्वच्छता करावी व तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व
ग्राहकास सॅनिटायझर्स उपलब्ध करून देणेत यावे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.