कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा
माहिती कार्यालय): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा
अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परिक्षा 2020 रविवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 11
ते 12 अशा एक सत्रात घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ
गलंडे यांनी दिली.
महाराष्ट्र दुय्यम
सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सुमारे 19 हजार 776 परीक्षार्थी बसणार असून शहरातील
महाविद्यालये व हायस्कूल अशा एकुण 58 उपकेंद्रावर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात
आली आहे.
परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरू
होण्यापूर्वी तीन तास अगोदर (सकाळी 7 वा.) केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनक्रमांक/ फोटो) व प्रवेश
प्रमाणपत्र सोबत आणायचे आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व
उमेदवारांनी मास्क वापरणे व सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य आहे.
के.आय.टी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कंदलगाव, पार्ट
ए, के.आय.टी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कंदलगाव, पार्ट बी, न्यू मॉडेल इंग्लिश स्कुल,
ताराबाई पार्क, प्रायवेट हायस्कूल, खासबाग, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,
न्यू महाव्दार रोड, पार्ट ए, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू महाव्दार
रोड, पार्ट बी, सौ. सरस्वतीबाई लोहिया हायस्कूल, महाव्दार रोड, न्यू हायस्कूल,
महाव्दार रोड, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, शिवाजी पेठ, गर्ल्स हायस्कूल,
प्रिन्सेस मराठा बोर्डींग हाऊस, शिवाजी पेठ, न्यू कॉलेज, शिवाजी पेठ, पार्ट ए,
न्यू कॉलेज, शिवाजी पेठ, पार्ट बी, उषाराजे गर्ल्स हायस्कूल,राजारामपुरी, ताराराणी
विद्यापीठ ज्यु. कॉलेज, टीडीएड, राजारामपुरी, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, सदर
बजार, राजाराम कॉलेज, सागर माळ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अँड ज्यु.
कॉलेज, जुना बुधवार पेठ, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड
टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, आझाद चौक,
यशवंतराव चव्हाण कॉलेज, गंगावेश, श्री शहाजी छत्रपती कॉलेज, दसरा चौक, गर्व्हमेंट
पॉलिटेक्निक, विद्या नगर, पार्ट ए, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक, विद्या नगर, पार्ट बी,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय,
विद्यापीठ रोड, पार्ट ए, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राजर्षी छत्रपती शाहू
महाराज कृषी महाविद्यालय, विद्यापीठ रोड, पार्ट बी, महावीर विद्यालय, नागाळा
पार्क, कमला कॉलेज, राजारामपुरी, छत्रपती शाहू इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस सायबर
कॉलेज, पार्ट ए, छत्रपती शाहू इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस सायबर कॉलेज, पार्ट बी, शहाजी
लॉ कॉलेज, शाहूपुरी, डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड टेक्नॉलॉजी, कसबा
बावडा, श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, राधानगरी रोड, छत्रपती राजाराम
हायस्कूल, कसबा बावडा, डीर्पामेंट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉट, शिवाजी विद्यापीठ, मेन राजाराम हायस्कूल
अँड ज्यु. कॉलेज, भवानी मंडप, भारती विद्यापीठ्स न्यू लॉ कॉलेज, आयटी पार्क,
मंगळवार पेठ, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, सुभाष रोड, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल,
सोमवार पेठ, एस.के. पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत, दादासाहेब मगदूम
हायस्कूल, न्यू पॅलेस रोड, नागाळा पार्क, तवन्नाप्पा पाटने हायस्कूल, राजारामपुरी,
शांतीनिकेतन, मोरेवाडी, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, साळोंखे नगर, न्यू
मॉडेल इंग्लिश स्कूल, ताराबाई पार्क, विवेकानंद सि. कॉलेज, ताराबाई पार्क, श्री.
वसंतराव चौगुले इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवाजी विद्यापीठ रोड, छत्रपती शाहू
विद्यालय, न्यू पॅलेस एरिया, नेहरू हायस्कूल कोल्हापूर, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ
इंजिनिअरींग, कंदलगाव, पार्ट ए, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कंदलगाव,
पार्ट बी, सें. झेव्हिअर्स हायस्कूल, नागाळा पार्क, विद्यापीठ हायस्कूल, भवानी
मंडप, भारती विद्यापीठ इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट, कदमवाडी, नागोजीराव पाटणकर
हायस्कूल, रंकाळा वेस, विश्वकर्मा कॉमर्स/सायन्स कॉलेज, कागल, न्यू पॉलिटेक्निक कॉलेज
, उचगाव, डॉ. डी.वाय.पाटील ज्यु. कॉलेज कदमवाडी व विवेकानंद ज्यु. कॉलेज ताराबाई
पार्क या ठिकाणी परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.