कोल्हापूर,
दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
सर्व मान्यताप्राप्त प्रयोगशाळा, रुग्णांलयांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडील शासन
निर्णयाव्दारे HRCT Chest तपासणी साठी
निश्चित केलेले दर (मशीनच्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावावेत. HRCT
Chest तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधित
प्रयोगशाळा/तपासणी केंद्रावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
योगेश साळे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात वाढ होतआहे. रुग्ण परस्पर
डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला न घेता प्रयोगशाळेमध्ये जाऊन HRCT किंवा तत्सम तपासण्या
करण्यासाठी जात असल्याचे निदर्शनास आहे.
कॉमेट सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण तसेच इतर रुग्ण
यांच्याकडून फक्त IRCT चाचणी केली जाते शासनाने या तपासणीसाठी खासगी रुग्णालये
किंवा CT Scan सुविध असलेल्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात येणाऱ्या तपासणीसाठी दर
निश्चित करुन CT Scan तपासणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनानुसार तपासाणी बाबत दर आकरण्यात यावेत.
जिल्ह्याती सर्व खासगी रुग्णालये, डॉक्टर्स यांनी
कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या किंवा इतर कारणांना HRCT व इतर चाचण्या
करण्याबरोबरच संबंधित रुग्णांची कोव्हीड-19 चाचणी (RTPCR/Antigen Tet) केली जाईल
याबाबतची खात्री करावी.
क्ष
किरण प्रयोगशाळेमध्ये सद्यस्थितीत कोणत्याही डॉक्टर्सच्या प्रिस्क्रीपशन शिवाय
HRCT किंवा इतर तत्सम तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. या
तपासणीमध्ये X-Ray व्दारे तपासणी असल्याने जोखिम असते. यासाठी नोंदणीकृत
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशन शिवाय तपासणी करण्यात येऊ नये.
जिल्ह्यातील
सर्व मान्यताप्राप्त क्ष-किरण प्रयागेशाळेनी HRCT Chest चाचणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या CT Sean मशिनव्दारे तपासणी
केले आहे हे नमूद करणे बंधनकारक राहील.
HRCT Chest तपासणी
साठी निश्चित केलेले दर या प्रमाणे.
Specifications of
CT machine |
Less than 16
slice CT |
Multi
detector CT (MD CT) 16-64 slices |
Multi
detector CT
(MD CT) More
than 64 slice |
Proposed rate
Inclusive of all taxes (in INR) |
2000/- |
2500/- |
3000/- |
HRCT
Chest तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी द्यावा. (Apart from Lung
Mediastinum and bones). HRCT Chest तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक
दर आकारणी केल्यास संबंधित प्रयोगशाळा/तपासणी केंद्रे कारवाईस पात्र राहतील.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.