कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून
येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या
व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित
केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी मागे घेतला आहे.
परंतु, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाबाबत
शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी त्याचप्रमाणे अलगीकरण व विलगीकरणाची
कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.