बुधवार, १४ एप्रिल, २०२१

रेमडिसीवीर साठा माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात द्यावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


 

  कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड रूग्णास रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या देखरेखीखाली पुरवठादाराकडून प्राप्त रेमडिसीवीर औषधाच्या साठ्याबाबतची माहिती दैनं‍दिन स्वरूपात जिल्हा नियंत्रण कक्षास देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिल्या.

नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार रेमडिसीवीर साठा विक्री /वितरण संबंधित रूग्णालयास करावे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तिस वैयक्तिक स्वरूपात रेमडिसीवीर साठा विक्री  करू नये. याबाबत कोणत्याही प्रकारचे उलंघन/ गैरप्रकार आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंडसंहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.