कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड 19 मुळे लागू
करण्यात आलेल्या संचारबंदीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला
असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज
कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी कळविले आहे.
समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे
हे सहाय्यता कक्षाचे प्रमुख असून सहाय्यता कक्षाचा
संपर्क क्र. 0231-2950162 व ई-मेल swozpkop@gmail.com
असा आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळा/ कार्यशाळेतील कर्मचाऱ्यामार्फत सहाय्य
करणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना सहाय्यता हवी असल्यास संपर्क साधावा असे
आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.