बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

साखर कारखाना परिसरात मनाई आदेश जारी

           कोल्हापूर दि.४ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या ऊसाला २३५०/- रुपये भाव मिळावा या मागणीसाठी दि. २ नोव्हेंबर २०११ रोजीपासून पंढरपूर ते बारामती पर्यंत पदयात्रेस सुरवात झाली आहे. तसेच शेतकरी संघटनेमार्फत ३ नोव्हेंबर २०११ रोजी अकलूज,बावडा, इंदापूर मार्गे भिगवण अशी रॅली काढणार आहेत. आंदोलनानिमित्त लोकांकडून साखर कारखान्यांची मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व आरोग्य राखण्याच्या दृष्टीने कोल्हापूरचे जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७४ मधील कलम १४४ अन्वये दि. ३ नोव्हेंबर २०११ रोजीपासून १५ नोव्हेंबर २०११ अखेर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना परिसरापासून ५०० मीटरचे अंतरापर्यंत आंदोलने करणे, मोर्चा काढणे, रॅली काढणे, ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची तोडफोड करणे, ऊस वाहतूक करणार्‍या वाहनातील हवा सोडणे इत्यादी कृत्ये करण्यास बंदी आदेश निर्गमित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.