इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

सैन्य दलात भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी कोल्हापुरात २८ नोव्हेंबरला निवड चाचणी

           कोल्हापूर दि. २३ : सैन्य दलात भरती होऊ इच्छिणार्‍या युवकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेले माजी सैनिक महामंडळाद्वारे (मेस्को) करंजे नाका, सातारा येथे सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्ग चालविले जाते. या केंद्गात निवास व भोजनासह दिल्या जाणार्‍या ३० दिवसाच्या प्रशिक्षणासाठी शासन निर्धारित चार हजार रुपये शुल्क आहे. या केंद्गातील ७८ वे प्रशिक्षण शिबीर २ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीत घेतले जाणार आहे. प्रवेशासाठी निवड चाचणीचा कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून महासैनिक ट्रेनिंग सेंटर, ७४९, ई वॉर्ड, लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला आहे.
        प्रशिक्षणासाठी इच्छुक युवकांनी निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रकांसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा. चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. निर्धारित शुल्कापैकी दोनशे रुपये लगेच भरुन त्यांनी शिबीरातील प्रवेश निश्चित करावा. गोवा राज्य व कर्नाटक सीमा भागातील युवकांनाही प्रशिक्षणाचा लाभ दिला जाईल. अधिक माहितीसाठी कमाडंट, महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर यांच्याशी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत दूरध्वनी ०२३१-२६६३१३२ किंवा मोबाईल ७५८८६२४०४३, ९९२३४४०७६५३ वर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.