इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

कोल्हापुरात ३ डिसेंबरपासून जिल्हा साहित्य संमेलन-ग्रंथोत्सव

कोल्हापूर दि. २९ : कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ पर्यंत कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव २०११ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
      राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथ लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापुरात तीन दिवस आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव व जिल्हा साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. जिल्ह्यातील खाजगी ग्रंथ विकेत्यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून रसिक वाचकांना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.
      ग्रंथ महोत्सवाबरोबरच कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात प्रकट मुलाखती, विविध विषयांवर चर्चासत्र, कवि संमेलन तसेच कलारजनी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
      पत्रकार परिषदेस ज्येष्ठ साहित्यिक चंद्गकुमार नलगे, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, डॉ. सुनिलकुमार लवटे, प्रा. अशोक चौसाळकर, प्रा. भैरव कुंभार, निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
      दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ पर्यंत ग्रंथोत्सव व कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन २०११ ची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. ३ डिसेंबर २०११
सकाळी ९-३० ते १० वाजेपर्यंत नोंदणी व चहापान.
उद्‌घाटन सत्र - सकाळी १० ते ११-३०. केशवराव कोठावळे ग्रंथनगरीचे उद्‌घाटन हस्ते सखा कलाल, स्वागतपर भाषण- लक्ष्मीकांत देशमुख, उद्‌घाटनपर भाषण - वसंत आबाजी डहाके, अध्यक्षीय भाषण - सखा कलाल, प्रमुख उपस्थिती - चंद्गकुमार नलगे, डॉ. जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर, वसंत शिर्के, मा. गो. माळी, विश्वनाथ शिंदे.
सत्र दुसरे -
सकाळी ११-३० ते दुपारी १-३० - सखा कलाल : व्यक्ती व वाड.मय, वक्ते- प्रा. भैरव कुंभार, रणधीर शिंदे. दुपारी १-३० ते २-३० विश्रांती.
सत्र तिसरे -
      दुपारी २-३० ते ४-३० प्रकट मुलाखत. दुपारी २-३० ते ३-३० गोविंद पानसरे. मुलाखतकार डॉ. रणधीर शिंदे व अ‍ॅड. मिलींद कदम, दुपारी ३-३० ते ४-३० अभिराम भडकमकर मुलाखतकार अरुण नाईक व सुरेश गुदले.
सत्र चौथे -
      दुपारी ४-३० ते ६ माझे लेखन, माझे चिंतन, सत्राध्यक्ष- जालंधर पाटील, सहभाग - मोहन पाटील, मंदा कदम, मंजुश्री गोखले, किरण गुरव.
सत्र पाचवे -
      रात्रौ ८ वाजता कलारजनी सादरकर्ते - सागर अध्यापक, सागर बगाडे.
रविवार दि. ४ डिसेंबर २०११.
सत्र सहावे -
      सकाळी ९-३० ते ११ पर्यंत साहित्य माझा श्वास, सत्राध्यक्ष डॉ. रमेश जाधव, सहभाग- उदयसिंह गायकवाड, विक्रमसिंह घाटगे, अरुण नरके.
सत्र सातवे -
      सकाळी ११ ते दुपारी १२-३० अनुवादित साहित्य : नवे पर्व, सत्राध्यक्ष - डॉ. सहदेव चौगुले, सहभाग - लीना सोहनी, सुप्रिया वकील, चंद्गशेखर मुरगूडकर.
सत्र आठवे -
      दुपारी १२-३० ते २ सीमावर्ती मराठी साहित्य, सत्राध्यक्ष - डॉ. अच्युत माने, सहभाग- महादेव मोरे, भीमराव गस्ती, प्राचार्य माधुरी शानबाग. दुपारी २ ते ३ विश्रांती.
सत्र नववे -
      दुपारी ३ ते ४-३० कवि संमेलन, अध्यक्ष डॉ. धम्मपाल रत्नाकर, सूत्रधार - अशोक भोईटे, सहभाग - राजाभाऊ शिरगुप्पे, मीरा सहस्त्रबुध्दे, रफीक सूरज, नीलांबरी कुलकर्णी, चंद्गकांत पोतदार, विनोद कांबळे, दिनकर खाडे व हेमंत डांगे.
समारोप सत्र -
दुपारी ४-३० ते ६, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर, अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख उपस्थिती - सखा कलाल, डॉ. सुनिलकुमार लवटे, राजन गवस, संजय शिंदे व सुभाष बोरकर.
सोमवार दि. ५ डिसेंबर २०११
      सकाळी ९ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन.
तसेच दि. ३ ते ५ डिसेंबर २०११ अखेर दररोज सकाळी ९-३० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.