इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

जाती दावा पडताळणीच्या कालमर्यादेबाबत शुध्दीपत्रक

       कोल्हापूर दि. २८ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचा जाती दावा पडताळणीसाठीचा विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक ते सर्व पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी शक्यतो चार महिने आधी तथापि किमान २ महिने पुर्वी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावे, अशा आशयाचे शुध्दीपत्रक जारी करण्यात आल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कळवले आहे.
      याबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांच्या जाती दावा पडताळणीसाठी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी ६ महिने आधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावीत याऐवजी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचा जाती दावा पडताळणीसाठी विहित नमुन्यातील नमुना अर्जासह आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापुर्वी शक्यतो ४ महिने आधी तथापि किमान २ महिने पुर्वी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावेत, असे वाचावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.