इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

जात पडताळणी अर्जाविषयी संबंधित विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा

         कोल्हापूर दि. ८ : विविध व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ कोल्हापूर यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. प्रस्तावांची समितीने छाननी केली असता, काही विद्यार्थी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमात सध्या प्रवेशित नसतानाही त्यांचे अर्ज दाखल झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्यास सांगितले आहे व (ज्यांची प्रकरणे दक्षता पथकाकडे सोपविलेली नाहीत) अशा व्यावसायिक अभ्यासक्रमातील जाती पडताळणी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी  सीईटी परिक्षेचा गुणतक्ता (मार्कमेमो), तंत्र शिक्षण विभागाकडून संबंधित महाविद्यालयाकडे प्रवेशासाठी द्यावयाचा आदेश, (Allotment Letter), सध्या ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित आहे, त्या महाविद्यालयाचे बोनाफाईट प्रमाणपत्र/ओळखपत्र इत्यादी मूळ कागदपत्रासह संबंधित उमेदवारांनी समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपर्क साधावा असे, रविंद्ग कदम पाटील, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.