कोल्हापूर दि. २१ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या विद्यमाने ३ ते ५ डिसेंबर २०११ या कालावधीत दुसरे कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन-२०११ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलन संयोजक व विश्वस्त डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या विद्यमाने गतवर्षीपासून कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन योजण्याची परंपरा जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने सुरु झाली असून गतवर्षी या आयोजनाचे साहित्य वर्तुळात स्वागत करण्यात आले होते. तरी सर्व साहित्यिक, वाचक, शिक्षक, प्राध्यापक व साहित्यप्रेमी रसिक जनतेने तिन्ही दिवस उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.