कोल्हापूर दि. १५ : राज्याचे कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी महालक्ष्मी एक्सप्रेसने सकाळी ७ वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व कागलकडे प्रयाण. ७-३० ते १० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वा. कागल येथून गडहिंग्लजकडे प्रयाण. ११ वा. गडहिंग्लज येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
गुरुवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७-३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १२ वा. कागल येथून कोल्हापूरकडे प्रयाण. १२-३० वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे अॅड. डी. डी. घाटगे व हायवे जमीन संपादन संदर्भात बैठक व नंतर १ वा. मुरगुड नगरपरिषद चर्चा. सायं. ४ वा. कागल येथे कागल शहर मेळावा. ६ वा. वडगाव, ता. हातकणंगले येथे वडगाव मेळावा. सोयीनुनसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७-३० ते १० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वा. कागलहून इचलकरंजीकडे प्रयाण. ११ वा. इचलकरंजी येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार दि. १९ नोव्हेंबर सकाळी ७-३० ते १० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वा. कागल येथे राखीव व सोयीनुसार कागल निवासस्थानी मुक्काम.
रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-१५ वा. मगर हॉल, कागल येथे श्री कय्युम गवंडी, शेंडूर यांच्याकडील लग्न समारंभास उपस्थिती. ११-३० वा. कागल येथून इचलकरंजीकडे प्रयाण. दुपारी १२-३० वा. इचलकरंजी येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२-३० वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२-२१ वा. शाहू हॉल, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे श्री. व्ही. बी. पाटील यांच्या मुलीच्या लग्नसमारंभास उपस्थिती. १ वाजल्यापासून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव. रात्री ८-३० वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.