इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण दिन उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन

         कोल्हापूर दि.५  :  देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम यांचा ११ नोव्हेंबर २०११ हा दिवस जन्मदिवस असल्याने तो शिक्षण  दिन म्हणून या दिवसापासून संपूर्ण देशात शिक्षण अधिकार शिक्षण अभियान सुरु होणार आहे. या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ११ नोव्हेंबर २०११ रोजी प्रार्थनेचे वेळी  विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान महोदयांचा संदेश वाचून दाखविण्यात यावा. राज्यामध्ये काही शाळांना १३ नोव्हेंबर २०११ पर्यंत सुट्टी आहे तेव्हा ११ नोव्हेंबर रोजी शिक्षण दिनानिमित्त ज्या शाळांना ११ नोव्हेंबर २०११ रोजी सुट्टी आहे अशा सर्व शाळा ११ नोव्हेंबर २०११ पासून सुरु करण्यात याव्यात, याची सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी नोंद घ्यावी असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.