इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

मुंबईतील डाक पेंशन अदालतसाठी तक्रारी पाठवा

              कोल्हापूर  दि. २८ : पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधिक्य अथवा समाधान वाढविते. ही सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्टाच्या खात्याने पेन्शन अदालत घेण्याचे ठरविले आहे. अदालतीमध्ये पोस्टाचे अधिकारी तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करतात. प्रधान मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई कार्यालयामध्ये ९ जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजता ३२ वी डाक पेंशन अदालत आयोजित केली आहे.    
             डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतन (पेंशन) संबंधी ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेंशन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित उदा. उत्तराधिकार तथा धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालतमध्ये विचारात घेतली जाणार नाही. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा तारीख व ज्या अधिकार्‍यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंशनबाबतची तक्रार आर. एन. निकम, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत प्रधान मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, २ रा माळा, मुंबई-४०० ००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दि. १३ डिसेंबर २०११ पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रधान मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.