कोल्हापूर दि. ९ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. १० नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. १० नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व कागलकडे प्रयाण. ७-३० ते ११-३० पर्यंत कागल येथे आगमन व निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
दि. ११ नोव्हेंबर रोजी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-१५ वा. शाहू हॉल, कागल येथे हुमायुम मुजावर यांच्याकडील विवाह कार्यास उपस्थिती. दुपारी १२ वाजता कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. १२-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सायं. ६ ते ७ वाजेपर्यंत कागल येथे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. ७ वाजता कोल्हापूरकडे प्रयाण. ७-३० वाजता खासबाग कुस्ती मैदान, कोल्हापूर येथे आगमन व कुस्त्यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता मोटारीने ताकारी रेल्वेस्थानकाकडे प्रयाण व महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व कागलकडे प्रयाण. ७-३० ते ११-३० पर्यंत कागल येथे आगमन व निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.