गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

बकरी ईद निमित्तजनावरांच्या कत्तलीस सार्वजनिक ठिकाणी बंदी

           कोल्हापूर, दि. ३ :  कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक ७ नोव्हेंबर २०११ रोजी बकरी ईद हा सण साजरा होत असल्याने यानिमित्त जनावरांची कत्तल केली जाण्याचा संभव असून या कृत्यामुळे समाजातील काही वर्गातील लोकांच्या भावनेवर त्याचा परिणाम होण्याचा संभव आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक शांतता व आरोग्य राखण्याच्या दृष्टीने अशा कृत्यांना वेळीच आळा घालणे इष्ट असल्याने कोल्हापूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय पवार यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७४ मधील कलम १४४ अन्वये दिनांक ५ नोव्हेंबर २०११ ते १२ नोव्हेंबर २०११ अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकांनी परवानगी प्राप्त जनावरांची कत्तल, कत्तलखान्या व्यतिरिक्त सार्वजनिक अगर खाजगी जागेत करण्याची नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यांवर जनतेच्या नजरेला पडेल अशा कोणत्याही ठिकाणी जनावरांची कत्तल करण्याची नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.