सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

कोल्हापूर येथे वेतनपडताळणी पथक दौरा

         कोल्हापूर दि.१४ : कोल्हापूर येथील कोषागार कार्यालय या ठिकाणी दि. १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०११ या कालावधीत वेतन पडताळणी पथक दौरा करणार आहेत. तरी या दिनांकास व वेळेत या कार्यालयातील सेवानिवृत्त/मयत कर्मचार्‍यांची सेवापुस्तके शासन वित्त विभाग परिपत्रक दि. २० जानेवारी २००१ नुसार परिपूर्ण करुन पडताळणी करुन घ्यावी. याकालावधीत फक्त सेवानिवृत्त झालेल्या व मयत कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तकांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे,असे लेखाधिकारी, वेतनपडताळणी पथक, पुणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.