इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

२६ नोव्हेंबरला महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यशाळा व हुंडाबंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन

       कोल्हापूर दि. २४ : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, कोल्हापूर व श्री शाहू शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०११ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यशाळा व हुंडाबंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९-३० वाजता होणार आहे.
      कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार असून श्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव चंद्गकांत ऊर्फ सुभाष बोंद्गे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या लोक विकास केंद्गाच्या संचालक डॉ. मंजुषा देशपांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      यावेळी महिला विषयक कायदे या विषयावर प्रा. डॉ. सविता रासम तर स्त्रीभ्रृण हत्त्या, लिंगभेद या विषयावर गिरीष लाड मार्गदर्शन करणार आहेत.
     कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापुरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.