सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

कोल्हापूर डाकविभागामार्फत मुलांसाठी स्टॅम्प डिझाईन स्पर्धेचे आयोजन

     कोल्हापूर दि. १४ :  टपाल खात्यातर्फे दि. २० नोव्हेंबर २०११ रोजी इयत्ता १ ली ते १२ वीच्या मुलांसाठी स्टॅम्प डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा तीन गटात असून स्पर्धेचा विषय सर्वांसाठी पोस्ट ऑफिस २०५० असा आहे. प्रत्येक गटात प्रथम येणार्‍या स्पर्धकाचे चित्र राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविले जाईल.
      सदर स्पर्धेसाठी  प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका दि. १६ नोव्हेंबर २०११ पर्यत प्रवर अधीक्षक डाक विभाग, कोल्हापूर यांचे कार्यालय, रमण मळा, हेड पोस्ट ऑफिस इमारत कसबा बावडा, कोल्हापूर याठिकाणी पोचतील अशा पाठवाव्यात.
   तरी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे प्रवर अधिक्षक डाक विभाग, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.