कोल्हापूर दि. ९ : भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ११ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात शिक्षणाचा अधिकार अभियान राबविण्यात येत आहे.
११ नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये परिपाठाच्यावेळी पंतप्रधान महोदयांच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार असून शाळा व्यवस्थापन समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेमध्ये शालेय भौतिक सुविधा, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व समाज सहभाग या शिक्षण हक्क कायद्यातील मुलभूत घटकावर आधारित शाळा व्यवस्थापन समितीद्वारे चर्चा विचारविनियम करुन शालेय विकास आराखडा तयार करण्याबाबत चर्चा होईल. विशेष शाळा व्यवस्थापन समितीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी जिल्हास्तर व गटस्तरावरील अधिकार्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. एससीईआरटी पुण्याचे सहसंचालक डी. एम. पाटील या कार्यक्रमास संपर्क अधिकारी म्हणून खास भेट देणार आहेत अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.