सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

अभिजीत घोरपडे यांचे बुधवारी व्याख्यान

     कोल्हापूर दि.१४ : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येत्या बुधवारी, दि. १६ नोव्हेंबर,२०११ रोजी लोकसत्ता, पुणेचे वरिष्ठ सहसंपादक अभिजीत घोरपडे यांचे व्याख्यान होणार आहे.
      विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
      श्री. घोरपडे पत्रकारिता- सार्वजनिक जबाबदारीचं माध्यम या विषयावर व्याख्यान देतील. बुधवारी शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.