कोल्हापूर दि.३ : महाराष्ट्र राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. ४ नोव्हेंबर २००११ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ४ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७ वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने कागलकडे प्रयाण. ७-३० ते १० वाजता कागल येथे आगमन व कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता शासकीय विश्रामगृह कागल येथे कुरुकली येथील कार्यकर्त्यासमवेत बैठक. ११ वाजता कागल येथून मोटारीने आजराकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता आजरा येथे आगमन व आजरा तालुका सहकारी साखर कारखाना गवसे, ता. आजरा या कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ३ वाजता मोटारीने जखेवाडी ता. गडहिंग्लजकडे प्रयाण. सायं ४ वाजता शिप्पुर येथील श्री शिवलिंग दुध संस्था शिप्पुर, ता. गडहिंग्लज या संस्थेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ५ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह कोल्हापूरकडे प्रयाण. ६ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
दि. ५ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते १० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता कागल येथून मोटारीने गडहिंग्लजकडे प्रयाण. ११ ते २ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यालय, गडहिंग्लज येथे आगमन व गडहिंग्लज शहर राखीव. दुपारी २ वाजता गडहिंग्लज येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. ३ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सायं. ५ वा. शाहू सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे ज्ञानेश्वर मुळे राष्ट्रीय विकास अकादमी, कोल्हापूरच्या ज्ञानगौरव कार्यक्रमास उपस्थिती. ५-३० वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे श्री. वैभव पाटील यांच्यासमवेत चर्चा. ६ वा. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे एकोंडी येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
दि. ६ नोव्हेंबर २०११ सकाळी ७-३० ते १०-३० वाजेपर्यत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वा. शासकीय विश्रामगृह कागल येथे श्री. शहाजी पाटील रा. गोरंबे यांचेसमवेत चर्चा. ११-१५ वाजता शासकीय विश्रामगृह कागल येथे दत्ता आवळेकर रा. लिंगनूर कापशी यांचेसमवेत चर्चा. ११-३० वाजता कागल येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.दुपारी १२ वा. कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ३ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे भोगावती साखर कारखान्यासंदर्भात खासदार राजू शेट्टी यांचेसमवेत चर्चा. सायं. ५ वाजता कोल्हापूर येथून मोटारीने वारणा कोडोलीकडे प्रयाण. ६ वाजता वारणा कोडोली येथे आगमन व राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
दि.७ नोव्हेंबर २०११ सकाळी ७-३० ते ८ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ८ वा. ईदगाह मैदान, कागल येथे बकरी ईदनिमित्त कागल येथे नमाज पठण. दुपारी १२-३० वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. १ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. व रात्री ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.